
रोजगाराभिमुख विनामूल्य प्रशिक्षणाचे आयोजन
पुणे, ता. १४ : रोजगाराभिमुख विनामूल्य प्रशिक्षणासाठीची नावनोंदणी २४ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. १८ ते ३० वयोगटातील ज्या मुला-मुलींना नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, त्यांनी लवकरात लवकर सेंटरला भेट देऊन प्रवेश निश्चित करावा.
डॉ. नानासाहेब परुळेकर सकाळ चॅरिटी ट्रस्ट व टेक महिंद्रा फाउंडेशनने हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेच्या मुला-मुलींसाठी ‘ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन’ हे प्रशिक्षण विनामूल्य घेतले जाते. प्रशिक्षणांतर्गतच इंग्रजी भाषा तसेच संगणक हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच रोजगार उपलब्धतेसाठी मदत पुरविली जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर भेट द्यावी किंवा संपर्क साधावा.
पत्ता : सुंदराबाई राऊत हॉस्पिटल, मामासाहेब मोहोळ स्कूलजवळ, केळेवाडी, कोथरूड, पुणे
संपर्क क्रमांक : ७४४७३०३१३४, ९६८९७३१५७०