संपाला पाठिंबा; पण काळ्याफिती लावून काम राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपाला पाठिंबा; पण काळ्याफिती लावून काम
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाची भूमिका
संपाला पाठिंबा; पण काळ्याफिती लावून काम राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाची भूमिका

संपाला पाठिंबा; पण काळ्याफिती लावून काम राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाची भूमिका

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून काम सुरुच ठेवण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केला आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा टप्पा असतात, त्या सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्य मंडळ, शिक्षण विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांनी केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेली परीक्षेची तयारी, विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता याचा विचार करून केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल. पण, परीक्षा केंद्रांवर काम करणारे कर्मचारी काळ्याफिती लावून काम करणार आहेत. परीक्षेच्या पर्यवेक्षणाचे काम वगळता परीक्षाविषयक सर्व कामकाजावर बहिष्कार राहील, असे महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर यांनी स्पष्ट केले आहे.

न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाला पाठिंबा आहे. परंतु सध्या दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांची आणि पालकांची मानसिकता लक्षात घेऊन परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संपाला पाठिंबा असला तरीही, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.
- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ