केटाबेल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप शनिवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केटाबेल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप शनिवारपासून
केटाबेल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप शनिवारपासून

केटाबेल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप शनिवारपासून

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : गिरेवॉय स्पोर्ट्स इंडिया फेडरेशनतर्फे (ता. १८ व १९ मार्च) रोजी पुण्यातील व्हीजे फिटनेस आणि स्पोर्ट्स क्लब बालेवाडी येथे राष्ट्रीय केटाबेल स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. या दोनदिवसीय स्पर्धेत सुमारे पंधरा पेक्षाही अधिक राज्यांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती गिरेवॉय स्पोर्ट्स इंडिया फेडरेशनचे सरचिटणीस पराग म्हेत्रे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये देशातील पुणे, मुंबई, चेन्नई, आंध्रप्रदेश, पंजाब, बंगळूर, गोवा, मध्यप्रदेश, आसाम, कोलकता, हरियाना, दिल्ली, मेघालय येथील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. याचे उद्‌घाटन रविवारी (ता. १९) दुपारी १२ वाजता होईल तर समारोप सायंकाळी ६ वाजता होणार आहे. तसेच १७ ते १९ मार्च या तीन दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती म्हेत्रे यांनी दिली.