पुणे परिसरात पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे परिसरात पावसाची शक्यता
पुणे परिसरात पावसाची शक्यता

पुणे परिसरात पावसाची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः पुणे शहर आणि परिसारत पुढील दोन दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत (ता. १६) ढगाळ वातावरणासह गारांचा पाऊस वर्तविण्यात आला आहे. ढगाळ वातावरणाची स्थिती पुढील पाच दिवस कायम राहणार आहे. पावसाच्या पोषक वातावरणामुळे शहर आणि परिसरात शनिवारपर्यंत (ता. १८) मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसासाठी हवामान पोषक झाले असून मंगळवारी (ता. १४) उत्तर महाराष्‍ट्रात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. दरम्यान बुधवारी (ता. १५) मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
मंगळवारी राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या राज्यातील कमाल तापमान हे ३४ ते ३८ अंशांच्या दरम्यान असून उन्हाचा ताप देखील कायम आहे. त्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. राज्यात पुढील चार दिवस विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात पाऊस कायम राहणार असून त्याचदरम्यान वाऱ्यांचा वेग हा ताशी ४० किलोमीटरपर्यंत असेल.

पावसासाठी पोषक हवामान का?
- बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे
- दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते कोकणपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय
- झारखंड ते तेलंगणपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे
- त्यातच पश्‍चिमेकडून येणारे वारे

बुधवारी (ता. १५) पावसाचा येलो अलर्ट ः
रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, नंदूरबार, नगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, अकोला, वाशीम, गोंदिया, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर