Fri, June 2, 2023

एमआयटी डब्ल्यूपीयू इनोव्हेशन हॅकेथॉन
एमआयटी डब्ल्यूपीयू इनोव्हेशन हॅकेथॉन
Published on : 15 March 2023, 12:55 pm
पुणे ः एमआयटी डब्ल्यूपीयू इनोव्हेशन हॅकेथॉन नुकतीच पार पडली. ही स्पर्धा आयडियाथॉन, फॉरमॅथॉन, आंत्रप्रेन्युरिअल, मेड इन एमआयटी डब्ल्यूपीयू आणि वर्कथॉन अशा पाच प्रकारांमध्ये आयोजित केली होती. विद्यार्थ्यांना संकल्पना वापरून त्यांना वास्तविक स्वरूपात सादर करायच्या होत्या. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित होते. याप्रसंगी अनुराग गर्ग, संजीव अन्नीगेरी, आशिष पांडे, अजय तोडकर, हॅकेथॉनचे समन्वयक डॉ. किशनप्रसाद गुणाले, प्रा. डॉ. मिलिंद पांडे, डॉ. तपन पांडा, डॉ. संजय कामटेकर, डॉ. कृष्णा वऱ्हाडे, गणेश पोकळे आदी उपस्थित होते.