खंडणी वसूल करणाऱ्या चौघांना सहा वर्ष सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणी वसूल करणाऱ्या चौघांना सहा वर्ष सक्तमजुरी
खंडणी वसूल करणाऱ्या चौघांना सहा वर्ष सक्तमजुरी

खंडणी वसूल करणाऱ्या चौघांना सहा वर्ष सक्तमजुरी

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : दहशत पसरवून खंडणी वसूल करणाऱ्या चौघांना मोका न्यायालयाने सहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी १५ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. मोकासह विविध कलमांनुसार ही शिक्षा सुनावली आहे.
अब्दुल गनी खान, अक्षय राजेश नार्इक, अक्रम नासीर पठाण आणि अक्षय अंकुश माने असे शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. याबाबत खडक येथील एका महिलेने फिर्याद दिली होती. दोन जून २०१७ रोजी हा प्रकार घडला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील विजय फरगडे यांनी पाहिले. फिर्यादींचा चायनिजचा गाडा आहे. घटनेच्या दिवशी आरोपी हे फिर्यादींच्या चायनिजच्या गाड्यावर आले व त्यांनी तेथील मुलगा मन्सूरकडे खंडणी मागितली. त्यावर मन्सूर ‘अब्दुल आज तो पैसे नहीं है, कल देते हैं’ असे म्हणाला. त्यामुळे अक्षय नाईकने कोयता काढून मन्सूरला जीवे मारण्याची तसेच चायनीज पदार्थामध्ये विष कालवण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी दमदाटी करून गाडीवरील सामान फेकले आणि तेथील वस्तुंचे नुकसान केले. आरोपींनी त्यांच्या टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी व अवैधरीत्या आर्थिक फायदा होण्याच्या उद्देशाने संघटितरीत्या अनेक गुन्हे केले आहेत, असे तपासात सिद्ध झाले आहे. दंड न भरल्यास चारही गुन्हेगारांना सहा महिने जादा कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे.