Sun, May 28, 2023

सिंहगडावर राजाराम महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा
सिंहगडावर राजाराम महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा
Published on : 15 March 2023, 2:37 am
पुणे ः किल्ले सिंहगड येथे छत्रपती राजाराम महाराजांच्या ३२३ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळी नऊ वाजता पुण्यस्मरण सोहळ्याला सुरवात होईल, अशी माहिती छत्रपती राजाराम महाराज सेवा प्रतिष्ठानने कळविली आहे. या वेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान होईल. आयोजनात सिंहगड ग्रामपंचायत, सरदार हरजी ढमढेरे परिवार आदींचा समावेश आहे.