कामकाज दुसऱ्या दिवशीही ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामकाज दुसऱ्या दिवशीही ठप्प
कामकाज दुसऱ्या दिवशीही ठप्प

कामकाज दुसऱ्या दिवशीही ठप्प

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १५ ः जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही सर्व सरकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प होते. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, प्रशासनाने बजावलेल्या नोटीस स्वीकारल्या नसल्याने कामावर हजर होणार नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी स्पष्ट केले.
जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी बुधवारी देखील कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या परिसरात धरणे आंदोलन केले. यावेळी झालेल्या सभेत पदाधिकाऱ्यांनी संपाचा निर्धार कायम असल्याचे सांगितले. वेगवेगळ्या विभागांमधील संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालये सलग दुसऱ्या दिवशी ओस पडली होती. त्यामुळे या कार्यालयांमध्ये कामासाठी असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळ‌वारी टपालही स्वीकारण्यात आले नव्हते. मात्र, आज तेथे एका कंत्राटी कामगाराला नियुक्त केले होते. प्रशासनाकडून शिस्तभंग, काम नाही वेतन नाही, अशा आशयाच्या नोटीस समाजमाध्यमाद्वारे संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, समाजमाध्यमातून देण्यात आलेल्या नोटिसा स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला.
दरम्यान, भूमी अभिलेख विभागाच्या राज्यातील साडेतीन हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. केवळ साडेतीनशे कर्मचारी कामावर आहेत. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू असलेले आणि तरीही संपात सहभागी झालेल्यांना नोटीस बजाविण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले.