Tue, June 6, 2023

पाटसदरम्यान ब्लॉक; आज सहा रेल्वेंना उशीर
पाटसदरम्यान ब्लॉक; आज सहा रेल्वेंना उशीर
Published on : 16 March 2023, 9:26 am
पुणे, ता. १५ ः पुणे-दौंड रेल्वे मार्गावर पाटस स्थानकाजवळ शुक्रवारी (ता. १७) ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून धावणाऱ्या सहा रेल्वेंना उशीर होणार असून एक रेल्वे रद्द केली आहे. दौंड-पुणे-दौंड ही गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच, दौंड-इंदूर एक्स्प्रेस दोन तास उशिराने सुटणार आहे. जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस, मुंबई- बंगळूर उद्यान एक्स्प्रेस, नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस, बंगळूर-मुंबई उद्यान एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत.