मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या 
वर्धापनदिनानिमित्त बुधवारी कार्यक्रम

मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी कार्यक्रम

पुणे, ता. १६ ः मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या ५३ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार प्रदान, पुस्तक प्रकाशन आणि व्याख्यान आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता.२२) सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील एस. एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे हे कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमात मुस्लीम सत्यशोधक पत्रिका वर्धापनदिन विशेषांक आणि ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ : एम्स - परस्पेक्टिव्ह अँड मॅनिफेस्टो’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांनी गुरुवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडळाचे खजिनदार दिलावर शेख, प्रा.जमीर शेख उपस्थित होते.
कार्यक्रमास अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावही उपस्थित असतील.
याप्रसंगी ऑल इंडिया पसमांदा मुस्लीम महाजचे राष्ट्रीय नेते व माजी खासदार अली अन्वर अन्सारी यांचे ‘अमृतमहोत्सवी वर्षातील भारत आणि पसमांदा मुस्लिमांच्या समस्या’ या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमात अंजुमन-आय इस्लामचे विद्यमान अध्यक्ष आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. झहिर काझी यांना ‘समाजप्रबोधन पुरस्कार’ आणि अमरावतीच्या उपजिल्हाधिकारी वसीमा शेख यांना ‘सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी अध्यक्षस्थानी असतील, असे शेख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com