ई-वाहनांच्या फास्ट चार्जिंगसाठी
‘बीपीसीएल’तर्फे सहा हायवे कॉरिडॉर

ई-वाहनांच्या फास्ट चार्जिंगसाठी ‘बीपीसीएल’तर्फे सहा हायवे कॉरिडॉर

पुणे, ता. १६ : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. अर्थात ‘बीपीसीएल’तर्फे पश्चिम भागातील सहा महामार्गांवर इलेक्ट्रिक (ई) वाहनांच्या फास्ट चार्जिंगसाठी कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. या कॉरिडॉरमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनचालकांची चिंता दूर होणार आहे.

या महामार्गांमध्ये पुणे-नगर-औरंगाबाद, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर, मुंबई-नाशिक आणि नाशिक-शिर्डी यांचा समावेश आहे. बीपीसीएल फ्युएल स्टेशनवरील ईव्ही फास्ट चार्जरमुळे केवळ ३० मिनिटांत ईव्ही रिचार्ज होणार आहे. त्याद्वारे १२५ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. महामार्गावरील अशा दोन सुविधांवरील अंतर १०० किमीच्या आत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य सरव्यवस्थापक (रिटेल इनिशिएटिव्हज आणि ब्रँड) शुभांकर सेन यांनी येथे दिली. या वेळी राज्य प्रमुख (रिटेल) राकेशकुमार सिन्हा, कार्यकारी संचालक संजीव अग्रवाल, मुख्य सरव्यवस्थापक (ब्रँड आणि पीआर) एस. अब्बास अख्तर, प्रमुख (रिटेल) अक्षय वाधवा आदी उपस्थित होते.

आतापर्यंत ‘बीपीसीएल’ने सहा महामार्गांचे इलेक्ट्रिक कॉरिडॉरमध्ये रूपांतर केले असून, ३१ मार्च २०२३ पर्यंत २०० महामार्गांवर इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग कॉरिडॉर उभारले जाणार आहेत. त्याद्वारे देशातील ईव्हीच्या वापराला चालना दिली जाणार आहे, असे सेन यांनी सांगितले. बीपीसीएलतर्फे उभारण्यात येत असलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचा हा सहावा आणि पश्चिम भागातील पहिला टप्पा आहे. सर्व ईव्ही ग्राहकांना पे-पर-यूज ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनची सुविधा वापरता येणार आहे. हे फास्ट चार्जर कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय वापरता येणार असून, गरज पडल्यास सपोर्ट स्टाफची मदत घेता येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

- फ्युएल स्टेशनवरील ३० केडब्ल्यू फास्ट चार्जिंग स्टेशनसह सहा हायवे इलेक्ट्रिक कॉरिडॉरमध्ये रूपांतर
- कॉरिडॉरमुळे लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनचालकांची चिंता दूर
- फ्युएल स्टेशनद्वारे ईव्ही चार्जिंगसाठी सुरक्षित पॉइंट्सबरोबरच चांगली स्वच्छतागृहे, उपहारगृहे पुरवली जाणार
- बीपीसीएल ३१ मार्च २०२३ पर्यंत २०० राष्ट्रीय महामार्गांचे इलेक्ट्रिक कॉरिडॉरमध्ये रूपांतर करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com