बिबवेवाडीत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबवेवाडीत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
बिबवेवाडीत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

बिबवेवाडीत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १९) बिबवेवाडी येथील पुष्प मंगल कार्यालयात सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. निर्जरा फाउंडेशन व ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या सहकार्याने हे शिबिर होत आहे.
निर्जरा फाउंडेशन ही पुण्यातील समविचारी व समवयस्क महिलांनी एकत्र येऊन सुरु केलेली संस्था आहे. पुण्यातील दुग्गड ग्रुप, रोटरॅक्ट ग्रुप, एलिमेंट्स ग्रुप व गौतम लभडी फाउंडेशन आदी सहयोगी संस्थांचे या रक्तदान शिबिरास सहकार्य मिळाले आहे. थॅलसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंगी आदी रुग्णांकरीता तसेच अपघातग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी आवश्यकता असते. यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांसह निर्जरा फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता बोथरा यांनी केले आहे.