‘कॉसमॉस’तर्फे दहा लाखांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कॉसमॉस’तर्फे दहा लाखांची मदत
‘कॉसमॉस’तर्फे दहा लाखांची मदत

‘कॉसमॉस’तर्फे दहा लाखांची मदत

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : आर्थिक दुर्बल घटक वर्गातील महिलांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत व्हावी म्हणून कॉसमॉस फाउंडेशन ट्रस्टतर्फे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दहा लाख रुपयांची मदत नुकतीच करण्यात आली. अल्प उत्पन्न गटातील गरजू महिलांना उपचार घेताना आवश्यकतेनुसार २५ हजार रुपयांपर्यंतची मदत रुग्णालय व्यवस्थापन खातरजमा करून करणार आहे. यासाठी फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. श्रीपाद पंचपोर आणि रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या प्रसंगी रुग्णालयाचे व्यवस्थापक सचिन व्यवहारे तसेच फाउंडेशनतर्फे विश्वस्त अरविंद देशपांडे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश प्रदीप सावंत, डॉ. सुधाकर न्हालधे, ट्रस्टचे व्यवस्थापक रवींद्र क्षीरसागर आणि ॲड. राधिका उर्सेकर आदी उपस्थित होते.