Tue, June 6, 2023

श्रीपाद सेवा मंडळातर्फे प्रवचन
श्रीपाद सेवा मंडळातर्फे प्रवचन
Published on : 16 March 2023, 4:08 am
पुणे, ता. १६ : योगिराज श्री. द. देशपांडे महाराज यांचा ३३ आणि शकुंतला आगटे यांचा चतुर्थ पुण्यतिथी महोत्सव श्रीपाद सेवा मंडळाने काकडे पॅलेस येथे साजरा केला. या वेळी शिरीष कवडे यांचे प्रवचन झाले. प्रा. डॉ. नारायण निकम महाराज यांचे श्रीराम चरितमानस या विषयावर हिंदी भाषेत प्रवचन झाले. तसेच किराणा घराण्याचे पं. संजय गरुड यांनी अभंग गायनसेवा सादर केली. भरत कामत (तबला) व विजय उपाध्ये (हार्मोनिअम) यांनी त्यांना साथ केली. शारदा ज्ञानपीठचे पं. वसंतराव गाडगीळ, लक्ष्मण महाराज कोकाटे, राजेंद्र महाराज दहिभाते या वेळी उपस्थित होते.