राज्यात वादळी पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात वादळी पावसाची शक्यता
राज्यात वादळी पावसाची शक्यता

राज्यात वादळी पावसाची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे. पोषक वातावरणामुळे पुढील काही दिवस राज्यात वादळी पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवारी (ता. १७) मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुणे, महाबळेश्‍वर, नागपूर, सातारा आदी ठिकाणी गुरुवारी पावसाने हजेरी लावली. भंडारा, पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. सध्या राज्यात ढगाळ हवामान व पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान हे ३० अंशांच्या खाली गेले आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमाल तापमानात ३ ते ९ अंशांनी घट झाली आहे. दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस म्हणजेच येत्या सोमवारपर्यंत (ता. २०) पावसाचा अंदाज कायम आहे.

आज येथे पावसाचा येलो अलर्ट ः
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, नगर, रत्नागिरी, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, अकोला, वाशीम, अमरावती, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, भंडारा.