पूर्वलक्षी प्रभावाने मिळकतकराची वसुली नको

पूर्वलक्षी प्रभावाने मिळकतकराची वसुली नको

पुणे, ता. १७ ः पुणेकरांची कोणतीही चूक नसताना मिळकतकरावरील ४० टक्के सवलत रद्द करून त्याची पूर्वलक्षीप्रभावाने वसुली सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात शुक्रवारी (ता. १७) बैठक घेत असताना त्यांनी ही सवलत पुन्हा लागू करावी व पूर्वलक्षी प्रभावाने वसुली करू नये, अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुधीर कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
पुणे महापालिकेने १९७० मध्ये मिळकतकरात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला, वर्षानुवर्षे त्याची अंमलबजावणी सुरू होती, पण या निर्णयास राज्य सरकारची अंतिम मंजुरी घेण्याचे राहून केले. १९७० चा ठराव अचानक ऑक्टोबर २०१८ मध्ये विखंडित केला, त्यामुळे आता ४० टक्के मिळकतकराची वसुली २०१९ पासून सुरू झाली आहे. ९७ हजार नागरिकांना हजारो रुपयांचा कर आला आहे. तर आणखी पाच ते सहा लाख नागरिकांवर त्याची टांगती तलवार आहे. यामध्ये सामान्य नागरिकांची काहीही चूक नाही. या प्रकरणामध्ये चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारने माफी दिली आहे, मग पुणेकरांना माफी का दिली जाऊ शकत नाही, याचा विचार करून पूर्वलक्षी प्रभावाने कुठल्याही रकमेची वसुली होऊ नये, अशी मागणी केसकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com