सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी एक लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला असून, या सर्व उमेदवारांना त्यांच्या लॉगइनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सेट आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा २६ मार्च रोजी होणार आहे. परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र १६ मार्चपासून उमेदवारांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध केली आहेत. तसेच, आवश्यक त्या सुचनेसह प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठविल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेटचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
प्रवेशपत्र व मूळ ओळखपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. २६ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सकाळी १० वाजल्यानंतर कोणत्याही सबबीवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे सेट विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.

महत्त्वाचे ः
सेटचे आयोजन ः१७ शहरांत
उमेदवारांची संख्या ः १ लाख १९ हजार ८१३
संकेतस्थळ ः https://setexam.unipune.ac.in