राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषदेचे आज आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषदेचे आज आयोजन
राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषदेचे आज आयोजन

राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषदेचे आज आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : ‘मिशन आर्थ्रायटिस इंडिया’(माई) तर्फे येत्या शनिवारी (ता. १८) ‘राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वयंप्रतिकारक संधिवाती आजारांत होणारे विविध परिणाम’ या संकल्पनेवर ही एकदिवसीय परिषद होणार आहे.

संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा बेडेकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्‍घाटन होईल. रशना दारूवाला आणि संधिवाततज्ज्ञ डॉ. अरविंद चोप्रा हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. संचेती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांना ‘कै. श्री. पी. सी. नहार वक्तृत्व पुरस्कार,’ शिवानी बर्वे यांना ‘हरिभाऊ राठीजी वात विरुद्ध योद्धा पुरस्कार,’ तर ‘सेंटर फॉर ऱ्हुमॅटिक डिसिजेसतर्फे ‘वात विरुद्ध योद्धा’ पुरस्कार नागपूर येथील भूषण घाटे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘माई’च्या अध्यक्षा दीपा मेहता यांनी दिली.