वाघोलीतील नागरिक 
रस्त्यासाठी न्यायालयात

वाघोलीतील नागरिक रस्त्यासाठी न्यायालयात

पुणे, ता. १७ ः वाघोलीतील बाकोरी रस्ता गेल्या १० वर्षांपासून कच्चाच आहे. अनेकदा रस्ता चांगला करून द्यावा, अशी मागणी केली असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने वाघोली हाउसिंग सोसायटीज असोसिएशनतर्फे (डब्ल्यूएचएसए) उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुणे महापालिका, पीएमआरडीए यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांनी खोटे आश्वासन देऊन घरे खरेदी करायला भाग पाडले. गेल्या १० वर्षांपासून या भागात ३५ हजार लोक राहात असले तरी बाकोरी रस्ता अद्यापही कागदावरच आहे. चांगला रस्ता मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे ‘डब्ल्यूएचएसए’चे वकील सत्या मुळे यांनी सांगितले.
बाकोरी रस्त्यावर ७५ पेक्षा जास्त सोसायट्यांमध्ये ३५ हजारांपेक्षा जास्त नागरिक राहात आहेत. हा रस्ता कच्चा असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत असून, हा रस्ता अत्यंत धोकादायक आहे. आम्ही हा रस्ता करून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले पण कोणत्याही यंत्रणेकडून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे जनहित याचिका दाखल केली आहे, असे ‘डब्ल्यूएचएसए’चे संचालक किरण मानकावळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com