पुणे परिमंडळातील ग्राहकांची १४५ कोटी रुपयांची थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे परिमंडळातील ग्राहकांची  
१४५ कोटी रुपयांची थकबाकी
पुणे परिमंडळातील ग्राहकांची १४५ कोटी रुपयांची थकबाकी

पुणे परिमंडळातील ग्राहकांची १४५ कोटी रुपयांची थकबाकी

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : पुणे परिमंडलातील सर्व वर्गवारीतील ६ लाख ३६ हजार ५४१ ग्राहकांकडे १४६ कोटी १४ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये ५ लाख ४९ हजार ३९७ घरगुती ग्राहकांकडे ९३ कोटी ५० लाख रुपये, तर ७५ हजार ४७ वाणिज्यिक ग्राहकांकडे ३३ कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे, तर १२ हजार ९७ औद्योगिक ग्राहकांकडे १८ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

महावितरणने वारंवार आवाहन करूनही वीजबिलांपोटीच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. तर मोहिमेमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणांहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्धही कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

पुणे शहरात २ लाख ४२ हजार ९३७ घरगुती ग्राहकांकडे ३४ कोटी ८२ लाख रुपये, ३७ हजार ८७९ वाणिज्यिक ग्राहकांकडे १३ कोटी ३४ लाख रुपये, ३ हजार २२४ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे शहरातील एकूण २ लाख ८४ हजार ४० वीजग्राहकांकडे ५० कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये १ लाख १ हजार ३५ घरगुती ग्राहकांकडे १८ कोटी ५० लाख रुपये, १६ हजार ९३५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ८ कोटी ७ लाख रुपये, तर ४ हजार ७९६ औद्योगिक ग्राहकांकडे ८ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १ लाख ३१ हजार ७६६ वीजग्राहकांकडे ३५ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये १ लाख ९६ हजार ४२४ घरगुती ग्राहकांकडे ४० कोटी १६ लाख रुपये, २० हजार २३३ वाणिज्यिक ग्राहकांकडे १२ कोटी २५ लाख रुपये, ४ हजार ७७ औद्योगिक ग्राहकांकडे ८ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांनी त्वरित थकबाकीचा भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी तसेच चालू वीजबिल नियमित भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.