रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग
रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग

रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : रिक्षाचालकाने एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी त्या चालकाला अटक केली आहे.
या प्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन संजय जगताप (वय ३९, रा. कोंढवे धावडे) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी कोथरूड परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती कोथरूड परिसरातून गुरुवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता रिक्षाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे निघाली होती. त्या वेळी रिक्षाचालकाने विद्यापीठाजवळ रस्त्यातच रिक्षा थांबवून तरुणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने रिक्षाचालकाला विरोध करून ती रिक्षातून बाहेर पडली. परंतु रिक्षाचालकाने तिला धमकावून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. या घटनेनंतर तरुणीने चतु:शृंगी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.