प्रॅक्टिकल स्किल्सचा पदवीप्रदान कार्यक्रम

प्रॅक्टिकल स्किल्सचा पदवीप्रदान कार्यक्रम

पुणे ः वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांचे प्रॅक्टिकल्स ट्रेनिंग देऊन सक्षम करण्याचा अभिनव उपक्रम प्रॅक्टिकल एज्यु स्किल्स या संस्थेद्वारे संचालक सन्मित शहा गेली अठरा वर्षे यशस्वीपणाने करीत आहेत. संस्थेचा पदवीप्रदान कार्यक्रम नुकताच झाला. लॉकडाउनच्या काळात अत्यंत वेगळ्या पद्धतीचा वापर करून शहा यांनी अनेक विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन शहरातील उत्कृष्ट दर्जाचे चार्टर्ड अकाउंटंट आणि टॅक्स कन्सल्टंट यांच्याकडून ऑनलाइन प्रशिक्षण दिले. तीन वर्षांच्या लॉकडाउनमध्ये अडकलेला त्यांचा पदवीदान समारंभ सिम्बॉयसिस कॉलेजच्या विश्व भवन सभागृहात नुकताच झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे होते. या कार्यक्रमात तीन वर्षांत पदवी प्राप्त झालेले बारामती सोलापूर आणि पुण्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि पालक उपस्थित होता. या प्रसंगी पुणे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महाराष्ट्र मंडळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले आणि व्यवस्थापनतज्ज्ञ चकोर गांधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com