विद्यार्थ्यांसाठी आज ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठी आज ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन
विद्यार्थ्यांसाठी आज ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी आज ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः एरो स्पोर्ट्स असोसिएशन, पुणेचे सदस्य डॉ. राममोहन नायर आणि नितीन शहाडे यांनी ‘जागतिक मौखिक आरोग्य दिना’निमित्त एमक्योर मेडिकल्स, पुणे यांच्या सहकार्याने ‘एरोमॉडेलिंग शो’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दिवे क्रीडा संकुल येथे रविवारी (ता. १९) सकाळी साडेआठ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. यासाठी सुमारे ३०० हून अधिक शालेय विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तर सत्र तसेच, डॉ. नायर यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी केली जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोफत दंत किटचे वाटप केले जाणार असल्याचे एरो स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे सांगितले आहे.