
सुखकर्ता प्रतिष्ठानतर्फे २५ कर्तबगार महिलांचा सन्मान
पुणे, ता.१८ : सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील २५ कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले.
प्रतिष्ठानतर्फे बुधवारी (ता. १५) झालेल्या कार्यक्रमात श्रमप्रतिष्ठा पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार, आदर्श विहिणी पुरस्कार आणि जीवन गौरव हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊनच्या अध्यक्षा आणि ससूनच्या माजी अधिष्ठाता डॉ. रेणू भारद्वाज, स्वानंद महिला मंडळाच्या संस्थापिका रंजना लोढा, प्रमुख वक्ते म्हणून लिज्जत पापडचे सुरेश कोते, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माया प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते. संगीता वेताळ यांनी सूत्रसंचालन केले.
वेदशास्त्रोत्तेजक सभा, सदाशिव पेठ ः सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील २५ कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले.