
पीएच.डी.चे मानकरी
पीएच.डी.चे मानकरी
जे. जे. टी. विश्वविद्यालय
प्रा. नितीन जोशी ः ग्रंथालयशास्रातील ‘युज ऑफ मोबाईल अॅप्लिकेशन इन लायब्ररी - ए स्टडी’ या शोधप्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली. पीएचडी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून प्रा. जोशी कार्यरत आहेत.
मार्गदर्शक ः प्रा.डॉ. रशिद खाटीक
फोटो ः 31613
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सुधाकर बोकेफोडे ः मानव्यविज्ञान विद्याशाखेअंतर्गत इतिहास विभागात ‘पुणे जिल्ह्यातील दलित चळवळ (१९५६ ते २०१०)’ प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली. बोकेफोडे यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी दुसरी पीएचडी मिळवली आहे. पिंपरी येथील ‘एएसएम’ इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज संस्थेचे संचालक आहेत.
मार्गदर्शक ः डॉ. दीपक गायकवाड आणि डॉ. श्रद्धा कुंभोजकर
फोटो ः 31614
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
शीतल शेवते ः विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत सूक्ष्मजीवशास्त्र विषयात ‘स्टडीज ऑल फोरम क्वेंचिंग बायोमॉल्यूक्युलज् ऑफ बॅक्टेरिअल ओरीजीन’ या प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली. डॉ. शेवते संध्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
मार्गदर्शक ः डॉ. निरंजन पाटील
फोटो ः हार्ड