Thur, June 1, 2023

दुचाकी चोरणारा अटक
दुचाकी चोरणारा अटक
Published on : 18 March 2023, 4:08 am
पुणे, ता. १८ : दुचाकी चोरी करणाऱ्यास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (एसीबी) अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाखांच्या दहा दुचाकी जप्त केल्या. प्रकाश महादू दुधवडे (वय २३, रा. पोखरी, जि.अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना दुचाकी चोरीबाबत कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शिळीमकर यांनी तपास पथकाला मार्गदर्शन करून कारवाईचे आदेश दिले होते.
दरम्यान, नऊ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत मोटार सायकल चोरावर मोठी कारवाई करत दहा लाख रुपये किमतीच्या एकूण २९ दुचाकी हस्तगत करत एकूण २६ गुन्हे उघडकीस आणले होते.