दहशत पसरविणारा गुंड तडीपार

दहशत पसरविणारा गुंड तडीपार

पुणे, ता. १८ : कोथरूड भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिला.
सूरज ऊर्फ सोन्या राम कुडले (वय ३२, रा. शास्त्रीनगर, पौड रस्ता, कोथरूड) असे तडीपार केलेल्या गुंडाचे नाव आहे. कुडले याच्या विरुद्ध कोथरूड, हिंजवडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, विनयभंग, तोडफोड करून दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्याला शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी तयार केला होता. सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा यांनी पुणे शहर, पिंपरी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com