रेल्वे स्थानकाचे प्रश्न तत्काळ सोडवा

रेल्वे स्थानकाचे प्रश्न तत्काळ सोडवा

पुणे, ता. १९ ः पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी आदी गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व मासिक पासधारकांची मोठी गर्दी असते. अनेकदा सीटवरून या दोघांमध्ये वाद होतो, तेव्हा रेल्वे प्रशासनाने संबंधित गाडीमध्ये तिकीट पर्यवेक्षक व आरपीएफची नियुक्ती करावी, यासह अन्य मागण्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी मांडल्या. डीआरएम कार्यालयात रेल्वे प्रशासन व सदस्य यांच्यात बैठक झाली. या वेळी सदस्यांनी विविध समस्यांचा पाढा वाचला.
पुणे रेल्वे स्थानकावर दाखल होणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सुरुवात पार्किंगपासून होते. पार्किंगच्या अनेक तक्रारी आहेत. रेल्वे प्रशासनाने अशा कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न सोडविण्यात आणखी रेल्वे प्रशासनाला यश आलेले नाही. पुणे स्थानकावर अजूनही कुचकामी कॅमेरे आहेत. ते तत्काळ हटवून चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. येत्या काही दिवसांत हडपसर स्थानकावरून प्रवासी गाड्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. मात्र सध्या प्रवासी सुविधा नाही. तेव्हा प्रवाशांची गैरसोय होता कामा नये, त्यासाठी हडपसर स्थानकावर प्रवाशांसाठी आवश्यक असलेली सुविधा द्यावी. यात पिण्याच्या पाण्याची सोय, प्रवाशांना बसण्यासाठी विश्रांती कक्ष आदींची सोय करावी आदी विविध मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या. या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुरानी दुबे, सिनिअर डीसीएम डॉ. मिलिंद हिरवे, सीनियर डीओएम डॉ. स्वप्नील नीला, डीसीएम डॉ. रामदास भिसे यांच्यासह सल्लागार समिती सदस्यांमध्ये निखिल काची, बशीर सुतार, श्रीनिवास शर्मा, अजित चौगुले, बशीर सुतार आदी उपस्थित होते.

प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची मागणी केली आहे. यात काही गाड्यांना थांबा देण्यापासून ते सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा विचार केला आहे.
- निखिल काची, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com