‘महाज्योती’तर्फे प्रशिक्षणाची नोंदणी सुरू

‘महाज्योती’तर्फे प्रशिक्षणाची नोंदणी सुरू

पुणे, ता. १९ ः महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) वतीने २०२५ मधील जेईई, नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याचे महाज्योतीतर्फे सांगण्यात आले आहे.
या संस्थेद्वारे दहावीची परीक्षा देत असलेल्या व येत्या शैक्षणिक सत्रात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ऑनलाइन प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत फायदा होईल. या प्रशिक्षणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या वतीने मोफत टॅब, तसेच प्रशिक्षणादरम्यान सुमारे दोन वर्षे दररोजचे सहा जीबी इंटरनेट मोफत दिले जाणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या www.mahajyoti .org.in या संकेतस्थळावर येत्या ३१ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांने आपली नववी पासची गुणपत्रिका, दहावीचे हॉल तिकीट, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, आधारकार्ड याच्या प्रति या संकेत स्थळांवर नोंदणी करताना अपलोड करावे लागणार. अपलोड केल्यावर विद्यार्थ्यांनी महाज्योतीकडे नोंदणी केलेल्या अर्जाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट आपले जवळ जपून ठेवावा. याशिवाय दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र व नीट, सीईटी परीक्षेची तयारी करीत असल्याचे हमी पत्र याच संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल.
पुणे जिल्हा व विभागातील सर्व ओबीसी घटकातील (इतर मागास वर्ग, व्हीजेएनटी, एसबीसी) या प्रवर्गातील दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन महाज्योतीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या वरिष्ठ सहाय्यक पल्लवी कडू यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com