अमली पदार्थांची तस्करी करणारे दोघे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमली पदार्थांची तस्करी करणारे दोघे अटकेत
अमली पदार्थांची तस्करी करणारे दोघे अटकेत

अमली पदार्थांची तस्करी करणारे दोघे अटकेत

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : अमली पदार्थ विरोधी पथकाने वानवडी परिसरात ११ लाखांचा अमली पदार्थ पकडला. या कारवाईत पोलिसांनी एमडी, एलसीडी, मशरूम तसेच चरस असा वेगवेगळा अमली पदार्थ पकडला असून, दोघांना अटक केली आहे.
लायनल लेझली मेस्करेंस (वय ३३) व रसल अन्थोनी चंदनशीव (वय २१, रा. वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांना दोघे संशयित अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी एका बँकेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने याठिकाणी सापळा रचला. तसेच, दोघे संशयित दिसताच त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता लायनल याच्याकडे एमडी, एलसीडी, मशरूम, चरस, हाशिस ऑइल तसेच रसल याच्याकडे एलसीडी पेपर, ओजीकोश गांजा आणि इतर ऐवज मिळाला. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ११ लाख ९३ हजारांचा ऐवज जप्त केला.