‘आयएमए’तर्फे यशस्वी महिला डॉक्टरांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयएमए’तर्फे यशस्वी महिला डॉक्टरांचा सन्मान
‘आयएमए’तर्फे यशस्वी महिला डॉक्टरांचा सन्मान

‘आयएमए’तर्फे यशस्वी महिला डॉक्टरांचा सन्मान

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘रेडिऑलॉजी ॲण्ड इमेजिंग असोसिएशन’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) पुणेतर्फे शहरातील यशस्वी महिला डॉक्टरांचा गौरव करण्यात आला.

वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरी व सामाजिक योगदान असणाऱ्या महिलांचा या वेळी सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी शहरातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. अनुराधा केळकर, डॉ. प्रिसीला जोशी, डॉ अनुपमा पाटील, डॉ. हिमानी तपस्वी, डॉ. जोशिता सिंग, डॉ. राजलक्ष्मी देवकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच डॉ. मधुवंती अभ्यंकर, डॉ. शुभदा जठार, डॉ. माधुरी लोकापूर, डॉ. दीपा दिवेकर, डॉ. रागिणी भिंगारे आणि डॉ. वंदना जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. समारंभाचे कार्यवाहक रेडिओलॉजी ॲण्ड इमेजिंग असोसिएशनच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. सुनील इंगळे व सचिव डॉ. दिशा बोंगाळे तसेच ‘आयएमए’च्या पुणे शाखेचे अध्यक्षा डॉ. मीनाक्षी देशपांडे, सचिव डॉ. अलका क्षीरसागर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. डॉ. अमिता हर्सुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी डॉ. विनया चितळे आणि डॉ. अपर्णा अत्रे या विषयावर विशेष व्याख्याने आयोजित केली होती. महिला डॉक्टरांनी केलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.