संचालकाला धमकावून खंडणी मागणारे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संचालकाला धमकावून खंडणी मागणारे अटकेत
संचालकाला धमकावून खंडणी मागणारे अटकेत

संचालकाला धमकावून खंडणी मागणारे अटकेत

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : सासवड परिसरातील एका महाविद्यालयाच्या संचालकाला धमकावून तीन लाखांची लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. अक्षय सुभाष मारणे (वय २९), गणेश बबनराव जगताप (वय ४०, दोघे रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत महाविद्यालयाच्या संचालकांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांचे सासवड परिसरात महाविद्यालय आहेत. आरोपी मारणे आणि जगताप यांनी महाविद्यालयाच्या संचालकांना धमकावले होते. तुमच्या विरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार दिली आहे, अशी धमकी देऊन त्यांनी महाविद्यालयाच्या संचालकांकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. मारणे आणि जगताप यांनी सासवड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नावाने धमकावून त्यांच्याकडे तीन लाखांची खंडणी मागितली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या संचालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून दोघांना पकडले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली.