तुळशीबाग श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळशीबाग श्रीराम मंदिरात
विविध धार्मिक कार्यक्रम
तुळशीबाग श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

तुळशीबाग श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या कार्यक्रमांची सुरवात गुढीपाडव्या दिवशी होणार आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले यांनी दिली.
हे उत्सव २२ मार्च ते एक एप्रिल या कालावधीत होणार आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामकथा प्रवचन, कीर्तन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. याचे आयोजन संस्थानचे विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने केले आहे. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी १७६१ मध्ये स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडित २६२वे वर्ष साजरे होत आहे.
गुढीपाडव्याला (ता. २२) श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार असून त्यादिवशी सकाळी सातपासून श्रीरामास पवमान अभिषेक, श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्री विष्णूसहस्त्रनाम, श्रीसुक्त व पुरुषसुक्त पठण होणार आहे. तसेच २२ ते २९ मार्च दरम्यान दररोज सकाळी नऊ वाजता श्री गणेश्वर शास्त्री पारखी यांचे सुश्राव्य रामकथा प्रवचन, दुपारी १२ वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे. याच कालावधीत दररोज सायंकाळी पाच वाजता कीर्तनकार उद्धवबुवा जावडेकर यांचे कीर्तन होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.