सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव
सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव

सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७३ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव गुरुवारी (ता. २३) अल्पबचत भवन, क्वीन्स गार्डन रस्ता, रेसिडेन्सी क्लबजवळ, कौन्सिल हॉल येथे होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, दीपक जेठवानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार राजेंद्र फेरवानी, सहखजिनदार नीलेश फेरवानी आदी उपस्थित होते.
अशोक वासवानी म्हणाले, ‘‘चेटीचंड महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. तर महोत्सवाची सुरुवात गुरुवारी (ता. २३) सायंकाळी सात वाजता भगवान साई झूलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून होईल. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून साधू वासवानी मिशनच्या दीदी कृष्णकुमारी उपस्थित राहणार आहेत.’’