कोरेगाव पार्क येथे वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्या मसाज सेंटर चालकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरेगाव पार्क येथे वेश्‍याव्यवसाय 
चालविणाऱ्या मसाज सेंटर चालकाला अटक
कोरेगाव पार्क येथे वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्या मसाज सेंटर चालकाला अटक

कोरेगाव पार्क येथे वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्या मसाज सेंटर चालकाला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : कोरेगाव पार्क येथे तरुणींकडून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या मसाज सेंटरच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मसाज सेंटरमधून चार परदेशी महिलांसह सात तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या दोन चालकांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसाज सेंटरचा व्यवस्थापक उत्तम शेषराव सोनकांबळे (वय ३८, रा. खराडी) आणि स्पा चालक गजानन दत्तात्रेय आडे अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी आरोपी उत्तम सोनकांबळे याला अटक करण्यात आली. कोरेगाव पार्क भागातील साऊथ मेन रस्त्यावरील एका स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. येथे परदेशी महिला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकून चार परदेशी महिलांसह सात जणींना ताब्यात घेतले.

संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या
पुणे, ता. १९ : एका संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंजवडी परिसरात शनिवारी घडली. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.
सायली वासुदेव बट्टे (वय २४, रा. झाशीनगर, गडचिरोली) असे मृत तरुणीचे नाव आहे. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळली नाही. तसेच, तिचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली. सायली ही वर्षभरापासून पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होती. सायलीचा भाऊ काही दिवस पुण्यात होता. तो नुकताच गडचिरोलीला गेल्यानंतर ती एकटी राहत होती. शनिवारी (ता. १८) तिने कुटुंबीयांशी संपर्क साधला, परंतु त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.