सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना शिष्यवृत्ती
सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना शिष्यवृत्ती

सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना शिष्यवृत्ती

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः ‘सकाळ’तर्फे घेण्यात आलेल्या ‘सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा’ स्पर्धेच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी राज्यातील साठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यातील प्रातिनिधिक स्वरूपात पुणे विभागातून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्हा परिसरातील गुणवंत आणि गरजू अशा ११ विजेत्यांना ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ‘श्री मुकुंद भवन ट्रस्ट’ यांच्या संयुक्त सहकार्याने प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे ‘सकाळ’ कार्यालयात वाटप करण्यात आले. या वेळी श्री मुकुंद भवन ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, डॉ. शैलेश गुजर, विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. सर्व वयोगटातील वाचकांसाठी ‘सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धा २०२२’ ही गेल्या वर्षी आयोजित केली होती.

पुणे विभागातील शिष्यवृत्ती विजेत्यांची नावे (चौथे बक्षिस)
१. साक्षी तळपे (अनुदानित आश्रमशाळा, फुलवडे, ता. आंबेगाव)
२. मानसी बो़डके (सोंडे माथना-करंजावणे, ता. वेल्हा)
३. साक्षी सुरवसे (सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी)
४. अमृता बरकाडे (प्रज्ञा प्राथमिक विद्यालय, फुरसुंगी)
५. अमृता जोरी (श्री सदगुरू बाबा महाराज सहस्त्रबुद्धे विद्यालय, पौड रस्ता)
६. राधा शिंदे (म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय, बालेवाडी)
७. विश्वजित चव्हाण (उत्कर्ष प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, आंबेगाव बु.)
८. अक्षदा सरकाळे (हुजूरपागा, कात्रज)
९. समृद्धी आढाव (एन. ई. एम. एस. स्कूल, सदाशिव पेठ)
१०. सोहम आरेकर (सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे विद्यालय, जुनी सांगवी)
११. महादेवी रसाळ (श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल, चिंचवड)

उर्वरित नावे लवकरच
स्पर्धेतील उर्वरित पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांची निवड मान्यवरांच्या हस्ते झाली असून, त्यांची नावे लवकरच ‘सकाळ’मधून जाहीर केली जातील. तसेच विजेत्यांशी लवकरच ‘सकाळ’मार्फत संपर्क साधला जाईल.

शिवाजीनगर ः सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना शिष्यवृत्ती धनादेश वाटप कर्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत (डावीकडून) डॉ. शैलेश गुजर, पुरुषोत्तम लोहिया व महेंद्र पिसाळ.