
बांधकाम क्षेत्रातील कल्पक नवनिर्मितीचे दूत व्हा : राजीव मिश्रा
पुणे, ता. १९ : ‘‘सृजनात्मक अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवे. त्यात अभियंता, आर्किटेक्ट सर्वांनी योगदान द्यावे. भविष्यात मोठी लोकसंख्या शहरात राहणारी असेल. शहरे सुंदर होण्यासाठी बदलाचे दूत व्हावे, असे मत राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी व्यक्त केले.
‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स ॲण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन’च्या वतीने ‘एईएसए व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ’ नुकताच पार पडला. त्यावेळी मिश्रा बोलत होते.
याप्रसंगी जयसिम फाउंटनहेड (बंगळूर)चे संचालक आर्किटेक्ट कृष्ण राव जयसिम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा आणि सर्वोत्तम बांधकाम प्रकल्पांचा गौरव करण्यात आला.
असोसिएशनचे अध्यक्ष पराग लकडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महेश बांगड, अशोक बेहेरे, सुहास लुंकड, सुहास जंगले, विश्वास कुलकर्णी, खजिनदार हेमंत खिरे, सहसचिव मनाली महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. राजीव राजे यांनी आभार मानले.