महिलांच्या प्रवासातून 
एसटीला मिळाले ३५ लाख

महिलांच्या प्रवासातून एसटीला मिळाले ३५ लाख

पुणे, ता. २० ः प्रवासात ५० टक्क्यांच्या सवलतीनंतर महिलांची संख्या वाढताना दिसत आहे. अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागात १ लाख ३१ हजार महिलांनी प्रवास केला असून, यातून सुमारे ३५ लाख रुपयांचे उत्त्पन्न एसटी खात्याला प्राप्त झाले आहे. तिकिटावरची उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याने एसटी आता फायद्यात येणार आहे. शनिवारी राज्यात ११ लाख ३० हजार महिला प्रवाशांनी प्रवास केला.
राज्य सरकारने अधिवेशनात महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीची घोषणा केली. त्याची अमंलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी पुणे विभागात १९ हजार १८६ महिलांनी प्रवास केला. १८ मार्चला ४६ हजार २२८ आणि १९ मार्चला ६५ हजार ४१४ महिलांनी प्रवास केला.

तारीख-महिला प्रवासी-उत्पन्न
- १७ मार्च-१९, १८६-४, ८८,२८१
- १८ मार्च-४६,२२८-१२,५८, ५३२
- १९ मार्च-६५,४१४-१७, ४६, ८१३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com