सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टद्वारे ध्यानाचे उपक्रम

सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टद्वारे ध्यानाचे उपक्रम

पुणे, ता. २० ः ओशोंची जाणीवपूर्वक जगण्याची शिकवण लोकांपर्यंत पोचविणे, यासाठी विविध ध्यानाचे उपक्रम शैक्षणिक पाया असलेल्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टद्वारे चालवले जात असल्याचे ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टने सोमवारी स्पष्ट केले. काही घटक आश्रमबाबत गैरसमज पसरवून गोंधळ निर्माण करीत आहेत. अशा घटकांपासून भाविकांनी सावध राहावे, असे आवाहन व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, आश्रमासमोर मंगळवारी आंदोलन होणार आहे.

ओशोंच्या विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा परिसर आणि येथील सर्व क्रिया-कल्प होतात. आश्रमाला सुमारे ५० वर्षे झाली आहेत. गेल्या ४० वर्षांपासून अधिक काळ येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यातून आश्रमाची देखभाल होते. तसेच प्रत्येक अनुयायाने गळ्यात माळ घातलीच पाहिजे, असे बंधन ओशोंनी १९८७ पासूनच काढून टाकले आहे. घरी ध्यान करताना माळ घालायला हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भगवान ओशोंसाठी सर्वच दिवस सारखे होते. ते उत्साहाने साजरे करावे, असे त्यांचे आवाहन होते. एखादा विशिष्ट दिवस साजरा करण्यावर त्यांचा आक्षेप होता. ओशो म्हणजे धर्म, परंपरा, संप्रदाय नाही. ही ध्यान साधना असून वैज्ञानिक पद्धतीने ध्यान प्रयोग करून जीवन जगावे, असे ओशो यांना अपेक्षित असल्याचे व्यवस्थापन समितीतर्फे मॉ अमृत साधना यांनी म्हटले आहे.

आश्रमासमोर आज आंदोलन
स्वामी अंतरशरण यांनी सांगितले की, दोन ते तीन ब्रिटिश भिक्षूंनी ओशो आश्रमाचा ताबा घेतला आहे. भारतीयांसाठी ध्यान आणि इतर सुविधा अनेक पटींनी महाग झाल्या आहेत. ज्या सामान्य भारतीयांना भिक्षूकांना परवडत नाहीत. ओशो समाधीचीही तोडफोड करण्यात आली आहे. परिस्थिती अशी आहे की भारतीय संन्याशांना त्यांच्याच देशातील आश्रमात प्रवेश दिला जात नाही. ओशोंची जपमाळ काढून आश्रमात प्रवेश करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे ओशोंचा वारसा धोक्यात आला आहे. त्यामुळे २१ मार्च रोजी आश्रमासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरेगाव पार्क ः देश-विदेशातून आलेले संन्याशी नोंदणी करताना. (MUN20Mar01-p1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com