हस्तकला प्रदर्शनाचे शुक्रवारपासून आयोजन

हस्तकला प्रदर्शनाचे शुक्रवारपासून आयोजन

पुणे, ता. २० : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे खादी संकल्पनेवर आधारित ‘स्पार्क २०२३’ या हस्तकला प्रदर्शनाचे शुक्रवार (ता. २४) ते रविवार (ता. २६) या कालावधीत आयोजन केले आहे. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी खादीपासून बनविलेल्या दोन हजार १०० विविध प्रकारच्या कलात्मक उत्पादनांचे सादरीकरण होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार असून, सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले असणार आहे, अशी माहिती सूर्यदत्तचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सूर्यदत्तच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, संचालिका प्रा. केतकी बापट, ‘एसआयएफटी’च्या विभागप्रमुख प्रा. पूजा विश्वकर्मा, प्रा. प्रियांका कामठे उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com