पद्मश्री पुरस्काराबद्दल दादा इदाते यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पद्मश्री पुरस्काराबद्दल दादा इदाते यांचा सत्कार
पद्मश्री पुरस्काराबद्दल दादा इदाते यांचा सत्कार

पद्मश्री पुरस्काराबद्दल दादा इदाते यांचा सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २० : पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दादा इदाते यांचा क्षितिज फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा. शुभांगी तांबट यांनी इदाते यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी समरसता मंचाने आयोजित केलेली संदेश यात्रा आणि समरक्षता यात्रा या विषयांचे अनुभव सांगितले. या वेळी प्रा. देशपांडे यांनी इदाते यांच्या कार्याचे कौतुक करून पद्मश्री पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष जवाहर तिवारी, अरविंद नाथस्वामी, वसंतराव प्रसादे, अनिल टेकवडे, धनंजय जगताप आदी उपस्थित होते. गीतांजली रणसिंग यांनी सूत्रसंचालन केले.