उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘म्हाडा’ची सोडत

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘म्हाडा’ची सोडत

पुणे, ता. २० : म्हाडा पुणे विभागाच्या वतीने पुणे, पिंपरी- चिंचवड शहरातील ३ हजार १२० सदनिकांची ऑनलाइन सोडत सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. गुढीपाडव्या मुहुर्तावर घरे मिळाल्याने नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी आणि अधिकाधिक घरे उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केली.

पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. या वेळी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने - पाटील, ओव्हरसाइट समिती अध्यक्ष एम. एम. पोतदार, उपायुक्त दीपक नलावडे, समिती सदस्य धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या ६ हजार ५८ सदनिकांसाठी ५८ हजार ४६७ अर्जदारांनी अर्जाची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे. यातील २ हजार ९३८ सदनिका या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या. ३ हजार १२० सदनिकांसाठी ५५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती नितीन माने -पाटील यांनी दिली. म्हाडाच्या सोडतीमध्ये घरे मिळालेल्यांना त्याची माहिती एसएमएस, ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे. तसेच म्हाडाच्या संकेतस्थळावर सुद्धा ही घरे मिळालेल्या नागरिकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे माने-पाटील यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात
एकूण सदनिका - ६ हजार ५८
एकूण प्राप्त अर्ज - ५८ हजार ४६७
म्हाडा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजना सदनिका - २ हजार ९३८
२० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेतील घरे - २ हजार ४८३
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे - ६३७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com