
‘तनिष्क’तर्फे गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर
पुणे, ता. २१ ः देशातील आघाडीचा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील ‘तनिष्क’ने गुढीपाडव्याच्या निमित्त दागिन्यांच्या प्रत्येक खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत भेट देण्याची आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. प्री-बुक करून ग्राहक या ऑफरसाठी क्लेम करू शकतील. याखेरीज इतर कोणत्याही ज्वेलरकडून घेतलेले जुने सोने तनिष्कमध्ये एक्स्चेंज करण्याची ऑफरही ब्रँडने सादर केली आहे.
अशाप्रकारे एक्स्चेंज करण्यात आलेल्या जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर तनिष्क ब्रँड १०० टक्के एक्स्चेंज मूल्य देत आहे. तनिष्कमधील प्रत्येक दागिन्यांसोबत बीआयएस हॉलमार्क असल्याने ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या १०० टक्के शुद्धतेची हमी मिळते. महाराष्ट्रातील सर्व तनिष्क स्टोअर्समध्ये गुढीपाडव्यापर्यंत (ता. २२) या ऑफरचा लाभ घेता येईल. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा अतिशय महत्त्वाचा सण समजला जातो. हा सण वसंत ऋतूचा पहिला दिवस असतो. त्यामुळे नवी सुरुवात करण्यासाठी तसेच सोने खरेदीसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे तनिष्कने यंदाच्या वर्षी गुढी पाडव्याला ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. तसेच मराठी महिलांच्या अनोख्या अभिरुचीला साजेशी सुंदर मंगळसूत्रांची श्रेणी तनिष्कने साकारली आहे. सोने व हिऱ्यांमध्ये बनलेल्या मंगळसूत्रांच्या या विशाल श्रेणीमध्ये पारंपारिक व कॅज्युअल डिझाइन्सचा समावेश आहे, ऑफिसमध्ये जाताना घालता येतील अशी, अगदी दररोज वापरण्यासाठी, विशेष प्रसंगी, सणासुदीला घालण्यासाठी अशी विविध प्रकारची मंगळसूत्रे यामध्ये आहेत.