भगतसिंग विचार मंचातर्फे नास्तिक मेळाव्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगतसिंग विचार मंचातर्फे नास्तिक मेळाव्याचे आयोजन
भगतसिंग विचार मंचातर्फे नास्तिक मेळाव्याचे आयोजन

भगतसिंग विचार मंचातर्फे नास्तिक मेळाव्याचे आयोजन

sakal_logo
By

भगतसिंग विचारमंचातर्फे आयोजित
नास्तिक मेळाव्यात पुस्तक प्रकाशन

पुणे, ता. २१ ः शहीद भगतसिंग विचार मंच, पुणे यांच्यातर्फे आठव्या नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्त्रीरोगतज्ज्ञ व विज्ञान लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर आणि आरजे संग्राम यांची भाषणे झाली. या वेळी ‘परमेश्वरावर मात’ या पुस्तकाचे प्रकाशन संजय सावरकर यांच्या हस्ते आणि ‘होय आम्ही नास्तिक आहोत’ या पुस्तकाचे प्रकाशन संदेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात लेख असलेल्या प्रा. मुजतबा लोखंडवाला, किरण गवळी, ज्योती कांबळी आदींनी मनोगत व्यक्त केले. रवी काटकर आणि हेमंत धानोरकर यांनी दोन्ही पुस्तकांचा परिचय करून दिला. अश्विनी सातव यांनी प्रास्ताविक केले. वैशाली जोग यांनी सूत्रसंचालन केले. विवेक पूनावाला यांनी आभार मानले.

अभियान प्रतिष्ठानतर्फे महिलांचा सन्मान
पुणे, ता. २१ ः अभियान प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रमिला गायकवाड, राधिका हावळ, संगीता यादव, डॉ. तस्लिम मुलाणी, ज्योती धमाळ, रजनी सरवदे आणि रजनी हजारे या महिलांचा समावेश होता. सबनीस यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व विशद करत या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार काकडे यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा धारणे यांनी केले. निलेश वरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवार यांनी केले. रोहन पायगुडे, राहुल गायकवाड, राजेश आवटी, पंकज शहा, राजेश पवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
पुणे, ता. २१ ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध संस्था-संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानतर्फे डेक्कन कॉर्नर येथील त्यांच्या पुतळ्यास अभिषेक व पूजा करण्यात आली. सृजन डिझाईन महाविद्यालयातर्फे त्यांच्या जीवनावरील ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक रवींद्र वंजारवाडकर तसेच हेमंत रासने, राहुल कलाटे, राजेश पांडे आदींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी भांडारकर इन्स्टिट्यूट, बारा बलुतेदार समाज विकास संघ, श्रीमंत आझाद हिंद, नवचैतन्य आदी संस्था व मंडळांतर्फेही अभिवादन करण्यात आले.