सरकारी कार्यालयांत कामकाज पूर्ववत

सरकारी कार्यालयांत कामकाज पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २१ : जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेला संप मागे घेण्यात आल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांचे कामकाज मंगळवारपासून पूर्ववत झाले. परिणामी पहिल्या दिवशी नागरिकांची कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती. मात्र, बुधवारी (ता. २२) गुढीपाडव्यानिमित्त शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला होता. या काळात सर्व शासकीय कार्यालये अंशतः सुरू असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांची कामे ठप्प झाली होती. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, विविध दाखले, शासकीय योजना, लाभ, वाहन नोंदणी, शहरातील काही, तर ग्रामीण भागातील मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी आदी कामे संपकाळात बंद होती. ही सर्व कामे मंगळवारपासून पूर्ववत झाली. त्यामुळे मंगळवारी पहिल्याच दिवशी नागरिकांची शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र होते.
दरम्यान एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. दरवर्षी एक एप्रिलपासून रेडी-रेकनरच्या दरात बदल होतो. गेल्या सात दिवसांपासून दस्तनोंदणी कार्यालयातील कर्मचारीही संपावर गेल्याने दस्तनोंदणीला फटका बसला होता. दरम्यान, मंगळवारी अमावस्या आणि बुधवारी पुन्हा सुट्टी असल्याने गुरुवारपासून दस्त नोंदणी कार्यालयांत मार्चअखेरमुळे नागरिकांची गर्दी उसळण्याची शक्यता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com