
कॅन्टोन्मेंट भाजपतर्फे महिला मेळावा
पुणे, ता. २२ : महिला या सर्व क्षेत्रात कार्यक्षम असून नियोजनबद्ध प्रशासन चालवत आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत घडाळ्याच्या काट्याप्रमाणे विनाविलंब तक्रार न करता प्रत्येक घरात महिला राबतच असते. हे नजरेस असतानाही आजही महिलांना हवा तसा योग्य तो मानसन्मान मिळत नसल्याची खंत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली. भारतीय जनता पक्ष पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदार संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निशा भंडारे, प्रा. डॉ. शीतल रणधीर, आमदार सुनील कांबळे, महा प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण उपस्थिती होते. मेळाव्याचे आयोजन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विवेक यादव यांनी तर संयोजन भाजप पुणे युवा मोर्चा उपाध्यक्ष संतोष यादव यांनी केले होते.