‘बीडीपी’बाबतचा निर्णय 
कायमचा निकाली काढा

‘बीडीपी’बाबतचा निर्णय कायमचा निकाली काढा

पुणे, ता. २२ ः शहराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या टेकड्या टिकाव्यात, या टेकड्यांवरील जैववैविध्य उद्यानासाठी (बीडीपी) आरक्षित जागांवरच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, तसेच ‘बीडीपी’बाबतचा निर्णय कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मंगळवारी मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शिंदे यांच्याकडे दिले. कोथरूड, वारजे, कर्वेनगर, बावधन अशा शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या टेकड्यांवर जैववैविध्य उद्यान म्हणून आरक्षित केल्या आहे. संबंधित टेकड्यांवर कोणत्याही स्वरूपाच्या बांधकामांना परवानगी नाही. असे असतानाही, या टेकड्यांच्याभोवती मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षण करायचे कसे असा प्रश्‍न कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘शहरातील बीडीपीची स्थिती काय आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. तेथील अनधिकृत बांधकामांबाबत अनेक वर्षे पाठपुरावा करूनही निर्णय झालेला नाही. त्याबाबत बैठक व कारवाई व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या टेकड्यांवर जर अनधिकृत बांधकामे होत असतील, तर पर्यावरण संरक्षणालाच हरताळ फासण्याचा प्रकार आहे. राज्यात कुठेही नाही, त्या बीडीपी अंतर्गतच्या टेकड्या पुण्यात आहेत. आत्तापर्यंत त्या टिकविल्या आहेत. त्या ठिकाणी सर्रासपणे मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत. हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com