Mon, June 5, 2023

वांबुरकर, वैरागकर यांना पुरस्कार
वांबुरकर, वैरागकर यांना पुरस्कार
Published on : 22 March 2023, 3:14 am
पुणे, ता. २२ ः दर्शनम् न्यास आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल यांच्या वतीने दरवर्षी सरदेशमुख महाराज पुरस्कार आणि पं. चंद्रकांत सरदेशमुख पुरस्कार असे दोन पुरस्कार एका अनुभवसिद्ध कलाकारास आणि एका युवा कलाकारास देण्यात येतात. यंदा या पुरस्कारांसाठी अनुक्रमे कथक कलाकार आभा वांबुरकर आणि युवा गायिका रागेश्री वैरागकर यांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार दिले जातील आणि नंतर दोन्ही कलाकार मैफल सादर करतील. शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी सहा वाजता विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.