
एस्ट्रा जेनबरोबर ‘मायलॅब’ची भागीदारी
पुणे, ता. २२ ः मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स कंपनीने एस्ट्रा जेनसोबत भागीदारीची घोषणा केली. त्यामुळे संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि कुवेतमध्ये ‘अँटोमेडेड मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स’ विकसित करणार आहे.
रोगनिदानासाठी आवश्यक रिएजट आणि किट्स या दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीतून विकसित करणार आहे. तसेच, स्वयंचलित वैद्यकीय उपकरणांचाही त्यात समावेश आहे. या भागीदारीतून मायलॅबचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तार स्पष्टपणे दिसतो. तसेच, उच्च दर्जाचे रोगनिदान अधिक सोप्या पद्धतीने करता येते, यासाठी मायलॅब सातत्याने कार्यरत आहे, हे त्यातून अधोरेखित होते.
मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, “ही भागीदारी वेगाने वाढणाऱ्या मॉलेक्युलर डायग्नोस्टिक मार्केटमध्ये आमची उपस्थिती वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. ‘यूएई‘ आणि कुवेतमधील प्रयोगशाळांमधून अचूक रोगनिदासाठी हे उपयुक्त ठरेल.’’
एस्ट्रा जेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक डॉ. पी. के. मेनन म्हणाले, ‘‘रोगनिदानाच्या तंत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा वेळी मायलॅबसारख्या कंपनीबरोबर केलेली भागीदारी दीर्घकालीन यशासाठी महत्त्वपूर्ण ठरते.’’