राम कदम कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी

राम कदम कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी

पुणे, ता. २३ ः रौप्य महोत्सव साजरा करत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवारी (ता. २९) केले आहे. यंदा भजन सम्राट अनुप जलोटा आणि प्रसिद्ध पार्श्वगायक जावेद अली यांना या पुरस्काराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली.
प्रत्येकी एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा आणि राम कदम यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचा कार्यक्रम पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे. यावेळी प्रतिष्ठानचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वीरेंद्र लाटकर आणि राकेश खराडे यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ निरूपणकार उल्हास पवार, ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठल मणियार, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, आमदार रवींद्र धंगेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com